देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री?

0

 Maharashtra Assembly Election Result 2024 : महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपाच्या नेतृत्वात महायुतीने दमदार कामगिरी केली आहे. त्यात सर्वाधिक जागा मिळवून भाजपा राज्यातील नंबर एकचा पक्ष बनला आहे. सलग तिसऱ्या निवडणुकीत भाजपाने १०० हून अधिक जागा जिंकल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत भाजपाने १३२ जागा जिंकल्या असून आता मुख्यमंत्रि‍पद आपल्याकडे घ्यावे अशी मागणी भाजपा आमदारांकडून सातत्याने वाढत आहे. 





मुख्यमंत्रिपदाबाबत दिल्लीत आज भाजपाच्या वरिष्ठांची बैठक होणार आहे. त्यात फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. 


भाजपाच्या नेत्यांकडून देवेंद्र फडवणीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी लावून धरण्यात येत आहे. मात्र महायुतीत अद्याप मुख्यमंत्रिपदाचा कुठलाही फॉर्म्युला ठरला नाही असं समोर येत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाला आमचा पाठिंबा आहे असं विधान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले आहे. परंतु एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद कायम राहावे अशी शिंदे गटातील आमदारांची मागणी आहे. भाजपाने या निवडणुकीत १३२, शिवसेनेने ५७ आणि राष्ट्रवादीने ४१ जागा जिंकल्या आहेत.


दरम्यान दिल्लीत आज महाराष्ट्रातील मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा होणार असून त्या बैठकीत मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार यावर शिक्कामोर्तब होईल. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडूनही मुख्यमंत्रिपदासाठी मागणी सुरू आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्री पद मिळावे अशी शिंदेसेनेच्या आमदारांनी आग्रह धरला आहे. परंतु दिल्लीत आजच्या बैठकीत पुढील निर्णय होणार आहेत. त्यामुळे संध्याकाळपर्यंत राज्यात एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार की नवा चेहरा मुख्यमंत्री म्हणून राज्याला मिळणार हे स्पष्ट होणार आहे. 


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)